Thursday, June 5, 2008

पहिला पाऊस

आनंद उवाच...............................

पहिल्या पावसाची पहिली सर,
तुझीच आठवण घेऊन आली,
आसुसलेल्या माझ्या मनाला,
हळुवारपणे भिजवुन गेली,

ऊरात माझ्या भरुन गेली,
मंद सुवास ओली माती,
चित्त आले बहरुनी माझे
हात घेता तुझाच हाती,

स्पर्श तुझा होता मजला,
मनात वाही तुफान वारा,
कल्पनेच्याही पलिकडे नेई,
वाहुन मज प्रेमाच्या धारा,

कडाडुन येई मग वीज अशी ही,
लगबग मग तु बिलगुन जाशी,
एकरुप मग होऊन मजसवे,
साधिशी संवाद तु ह्रुदयाशी,

असेच वेडावुन माझे मन,
बेभान करुन टाक कायमचे,
व्यापुन दुनिया सारी माझी,
स्वप्न असुदे तुझ्याच प्रीतीचे,
स्वप्न असुदे तुझ्याच प्रीतीचे.........................

Thursday, June 14, 2007

मनाचे श्लोक

आनंद उवाच.................


नको रे मना धरु गर्व वृथाचा । नाशासी नेई मार्ग आयुष्याचा ।
अहंभावे करीसी वृत्तीस कोते । सुखास लागे जर हा क्षयाचा ॥

अहंगंडाने होई माती कार्याची । कर्तुत्वास ग्रासे छाया ग्रहणाची ।
नको रे मना जाउ "अहं"च्या आहारी । अभिमान त्यजताच प्राप्ति होई फळाची ॥

अहंकार गळुनी जाऊदे "मी" पणा हा । मळभ दुर करुनी पसरु दे तु प्रकाशा ।
पसरुनी बाहू घे मोकळासा श्वास । सामावुन घे पूर्ण तु अवकाशा ॥

विसर्जिता अहंकार दिसे दिव्य तेज । ज्ञानास येई नम्रतेचा जो साज ।
आत्म्यास येई झळाळी परमात्म्याची ॥ हुंकार देई अंतरात्म्याचा आवाज ॥